हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव झाला. विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठी 11 उमेदवार उभे होते. यामध्ये अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांनी बाजी मारली. पण काँग्रेस चेच दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना अनपेक्षित पणे पराभवाचा सामना करावा लागला. हाती संख्याबळ नसताना देखील भाजपने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती पुन्हा एकदा दिसून आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहीर, भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला. ही सर्व मते पहिल्या पसंतीची होते.
काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती… मात्र दोघांच्या लढाईत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. काँग्रेस च्या दोन्ही उमेदवारांना आपला 26 मतांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. महाविकास आघाडीची हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडीत एकी नाही हे पुन्हा एकदा दिसून आले.