मुंबई प्रतिनिधी | २०१४ साली भाजपची रणनीती आखून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यास किंगमेकरची भूमिका निभावणारे भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘माताेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करून दाेन्ही पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा व युतीची ताकद वाढवा’ असा सल्ला प्रशांत किशाेर यांनी ठाकरेंना दिला असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन, अशी ग्वाहीही दिल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या सभेत ‘चाैकीदार चाेर है’ अशी टीका केली हाेती. त्या वक्तव्यामुळे मोदी नाराज झाल्याचे प्रशांत किशाेर यांनी ठाकरेंना या भेटीत सांगितले. तसेच युती करायची असल्याने यापुढे तुम्ही अशी वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही प्रशांत यांनी ठाकरेंना दिला. प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा सर्व्हे केला आहे. त्या आधारे स्वबळावर लढल्यास शिवसेनेला किती जागा मिळू शकतील, याबाबतही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत स्वबळापेक्षा युतीच हिताची, असा निष्कर्ष काढणारा अहवालही त्यांनी ठाकरेंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगामी निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर पक्षातील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. भाजपशी युती करायची की नाही, हाच या बैठकीचा मुख्य विषय हाेता. काही खासदार युतीसाठी आग्रही असताना, ‘युती होईल किंवा नाही होईल याची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कामाला लागा’ असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला. ‘जिथे जिथे शिवसेना कमकुवत असेल तिकडे पक्षबांधणी मजबूत करा’ अशी सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. भाजपने शिवसेनेला एक जागा वाढवून म्हणजे २३ जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याची माध्यमांतून दिवसभर चर्चा हाेती; मात्र असा काही प्रस्ताव पक्षाकडे आला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..
आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…
शिवसेनेला निवडणुकांपेक्षा लोकांची कामे अधिक महत्वाची, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला