हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना नवे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे दिल्लीत सोनिया गांधी लवकरच कोणता महत्वाचा निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे जास्तच चर्चेत आले आहेत. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत प्रशांत केशर यांनी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना काही नवे पर्याय सुचवले आहेत. सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या कमराबंद चर्चेवेळी प्रशांत किशोर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांना राजकीय निर्णय घेईल अशी विशेष सल्लागार समिती गठित करायला हवी. जेणेकरून आघाडीसोबत निवडणूक प्रचार कॅम्पेनसह सर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ शकेल. आवश्यक काम झाल्यानंतर ही समिती निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हायकमांडकडे किंवा कार्यकारी समितीत प्रस्ताव ठेवेल, असे अनेक पर्याय सुचवले आहेत.