प्रशांत किशोर नवा राजकीय पक्ष स्थापन करणार ?? ट्विट करत दिले संकेत

prashant kishor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेससोबतची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत. प्रशांत किशोर यांनी याबाबत ट्विट करत नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच या नव्या इनिंगची सुरुवात बिहारमधून करण्यात येईल अशीही शक्यता आहे.

लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्याच्या प्रयत्नात 10 वर्षांचा प्रवास. आता मी नव्याने सुरुवात केली आहे, खरी काम करण्याची, लोकांपर्यंत पोहोचण्याची, समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि ‘जन सूरज’च्या मार्गावर जाण्याची हीच वेळ आहे. त्यांनी ट्विटच्या शेवटी लिहिले की, ‘बिहारपासून सुरुवात करू असा हॅश टॅग देखील वापरला आहे.प्रशांत किशोर यांच्या ट्विटवरून असा अंदाज बांधला जात आहे की, ते इतर कोणत्याही पक्षासाठी रणनीती बनवण्याऐवजी वेगळा राजकीय पक्ष काढू शकतात.

प्रशांत किशोर यांची २०२४ लाेकसभा निवडणूक संदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्‍यांबरोबर चर्चा झाली. ते लवकरच काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील असेही म्हंटल जात होते. मात्र आता ते स्‍वत:चा राजकीय पक्षांच्‍या स्‍थापन करणार अहेत. त्‍यांचा पक्षाचा प्रचारासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करेल. या पक्षाचा जनसंपर्क हा डिजिटल माध्‍यामतून होईल अशा चर्चा रंगल्या आहेत

याआधी प्रशांत किशोर यांनी भाजप, जेडीयू, टीएमसी, काँग्रेससह अनेक पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे, पीकेने आधीच जाहीर केले होते की तो 2 मे पर्यंत त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेईल. त्यांचे हे ट्विट त्यांच्या राजकीय भवितव्याची घोषणा मानली जात आहे.