हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात दिलासा देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. ती आता कोर्टाकडून फेटाळून लावली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरेकर यांच्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितललया नंतर दरेकर यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विधानसभेत भाजप नेत्यांनीही चांगलाच गदारोळ घातला. तसेच सभात्यागही केला.
मुंबै बँकेतील निवडणुकीच्यावेळी प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतः मजूर असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान कोर्टाने दरेकर यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली.