सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन रद्द करतोय, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला.
दरेकर म्हणाले, आता नाना पटोले सात आहेत कि मला मुंबईकरांना त्रास नको म्हणून मी आंदोलन मागे घेतोय. म्हणजे नाना आता उपरती झाली का? काल ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी हा विचार आला नाही का? उद्याच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होणार आहे. ज्यादिवशी आम्ही ठोशास ठोसा देण्याची भूमिका घेतली. जर चाल करून भाजपवर कोणी येणार असेल तर तुमचा समज असेल तर कुणी अंगावर आल्यास आम्हीही त्याला शिंगावर घेऊ, हि जेव्हा आम्ही एक्शनला रिएक्शनची भूमिका घेतली. तेव्हा ते जमिनीवर आले.
मला वाटते महाविकास आघाडी सरकारकडे काय चांगले काम केले. हे दाखवता येत नाही. हे पूर्णपणे अपयशी झाले आहेत. म्हणून भावनिक वाद विवाद निर्माण करायचे काम केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद उभा करायचा. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये, भाजपशी वाद उभा करायचा. अशा प्रकारे संघर्षाचे वातावरण निर्माण करीत लोकांचे लक्ष येथील मूळ प्रश्नांपासून विचलित करायचे. हि यांची धोरनात्मक भूमिका आहे, अशी टीकाही यावेळी दरेकर यांनी केली.