हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधल्या नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली.
संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरच लक्ष ठेवावं. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? याची चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे”, असा दावा करत प्रवीण दरेकर यांनी खळबळ उडवून दिली.
तत्पूर्वी संजय राऊत यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्या वरून भाजप आणि वकील गुणारत्ने सदावर्ते यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पवारांच्या घरावर झालेलं आंदोलन नव्हतं. तो हल्ला होता आणि त्यात एसटीचे कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढावीत. भाजपानं नवनिर्माण केलेला गुणरत्न सदावर्ते याला भाजपाचं पाठबळ आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. आर्थिक रसद कोण पुरवतं याची कल्पना सर्वांना आहे. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.