आता बदलला जाणार मोबाइल SIM कनेक्शनसाठीचा ‘हा’ मोठा नियम, त्याबद्दल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रीपेड मोबाईलला पोस्टपेड कनेक्शनमध्ये ट्रान्सफर करणे सोपे होईल. मोबाइल ग्राहकांना यापुढे प्रीपेड सिम कार्ड पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पुन्हा व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही. यासाठी केवळ एक OTP ग्राहकांचे काम सुकर करेल. सांगण्यात आले आहे की आता ग्राहकांचे पोस्टपेड कनेक्शन OTP ने सुरू होईल.

दूरसंचार विभाग लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, असे सांगण्यात आले. म्हणजेच ग्राहकांना री-व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही आणि केवळ OTP द्वारे ग्राहकांच्या मोबाइलवर व्हेरिफिकेशन केले जाईल. त्याशिवाय बिलिंगसाठी ग्राहक त्यांचा अ‍ॅड्रेस प्रूफ कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करू शकतात.

दूरसंचार विभागाने ग्राहकांच्या व्हेरिफिकेशन साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ते एक ते दोन आठवड्यांत प्रसिद्ध होऊ शकतात. देशात 90 कोटीहून अधिक प्रीपेड मोबाइल ग्राहक आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या ग्राहकांनाही याचा फायदा होईल, अशी माहिती मिळाली आहे, कारण इतर कोणत्याही राज्यातील प्रीपेड सिम जम्मू-काश्मीरमध्ये काम करत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.