हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले असून आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.
आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1 हजार 53 रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत 18 रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.
Domestic 14.2 kg LPG cylinder's prices increased by Rs 50/cylinder with effect from today. Domestic LPG cylinder will now cost Rs 1053 in Delhi. 5kg domestic cylinder price increase by Rs 18/cylinder. 19kg commercial cylinder prices decreased by Rs 8.50.
— ANI (@ANI) July 6, 2022
विशेष म्हणजे, याआधी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे आता गृहिणींच्या बजेटवर परिणाम होणार आहे.
हे पण पहा –
LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ
LPG Price : 1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!
LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!
LPG Gas Cylinder Price: LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या