हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना सत्काराच्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवशाहीर बाबासाहेबांची शैली, त्यांची लेखणी इतिहास नजरेसमोर उभी करणारी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभरावे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेछया दिल्या. यावेळी मोदी म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रत्येकवेळी प्रयत्न केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा युवकांपर्यंत पोहचवा. छत्रपतींच्या इतिहासापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी. शिवशाहीर पुरंदरे आजपण शिवश्रुष्टीच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत.
शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला, इतिहासाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी योगदान दिले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यांचा युवकांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.