नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. NEET -PG परीक्षा कमीत कमी चार महिने पुढे ढकलली जावी तसेच कोविड ड्युटीत शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे.
याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय व कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केलं पाहिजे.
A series of decisions that will increase the availability of medical personnel to strengthen the fight against COVID-19. https://t.co/8lAlRPrc9h
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2021
कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय व कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. नुकतेच हृदयरोग सर्जन डॉक्टर देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले की ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारक यांच्यावर येणार असून त्यांची कमतरता भासू शकते. मे महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणं कठीण होईल.
मोदींच्या निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे
– वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ करोना नर्सिंग मध्ये bsc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
– ड्युटीवर असणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.
-सर्व कोविड योद्धा करोना विरुद्ध शंभर दिवसांच्या कर्तव्यासाठी तयार असतील ते पूर्ण करतील त्यांना भारत सरकारच्यावतीने पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील देण्यात येईल.
– पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरलं जाऊ शकतं.