हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेच्या अधिवेशनात विरोधकांकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तसेच अधिवेशन चालू न देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संताप व्यक्त केला. अधिवेशन चालू न देणे हा तर लोकांचा तसेच लोकशाहीचा अपमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वत्र पेगॅसस, कोरोनाचे वाढत असलेले प्रमाण तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून केले जात असलेले आंदोलन या कारणांवरून विरोधकांकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ संसदेत ट्रॅकटर घेऊन येत आंदोलन केले होते. या सर्व गोष्टीवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप करताना म्हंटल आहे की, विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवरून लोकसभा तसेच राज्यसभेत गदारोळ घातला जात आहे. सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत आरोप केला आहे.