माझ्यासाठी सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची; ‘मन कि बात’मधून नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल तातडीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आज ‘मन कि बात’मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन कि बात”मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसानंतर डिसेंबर महिना येत आहे. डिसेंबर महिन्यात आपल्याला नवीन वर्षाची चाहूल लागते. डिसेंबरमध्ये नौदल दिवस आणि इतर सेना दलांच्या स्थापनांचा दिवस आहे. 16 डिसेंबर हा 1971 च्या युद्धाची आठवण म्हणून साजरा करतो. नमो अ‌ॅपच्या माध्यमातून आपण मला अनेक विषय सुचवता. “मन की बात”चा परिवार वाढत आहे. सीतापूरच्या एका विद्यार्थिनीनं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवामुळं फायदा झाल्याचं लिहिलं. अमृत महोत्सव आपल्याला देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणा देते.

आझादी की कहाणी बच्चो की जुबानी या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी नेपाळ, मॉरिशस आणि फिजीचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. झाशीच्या राणी या स्वातंत्र्य लढ्यात लढत होत्या. राणी लक्ष्मीबाई ईस्ट इंडिया कंपनीशी कायदेशीर लढाई लढत होत्या त्यांचे वकील जॉन लेग होते. ते ऑस्ट्रेलियाचे होते. झाशीनं आपल्याला राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मेजर ध्यानंचंद यांच्यासारखी महत्त्वाची व्यक्तिमत्व देशाला दिली, असे मोदी यांनी म्हंटले.

अजूनही कोरोना गेलेला नाही, काळजी घ्या – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन कि बात’मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एक गोष्ट लक्षात घ्यावी कि अजूनही कोरोना जगातून गेलेला नाही. त्याची भीती अजूनही आहे. त्यामुळे आताही सर्वानी खबरदारी घ्यावी. आणि कोरोनापासून स्वताचे रक्षण करावे, असे मोदी यांनी म्हंटले.