व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोदींनी 7 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही हाच गुण आवडतो- प्रीतम मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे​ त्यांनी गेल्या 7 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याविषयी त्यांच्यावर टीका झाली. पण जो माणूस आपलं काम करतो, तो आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो.

त्याच्याबद्दल चांगले बोलणारे जर १० लोकं असतील तर टीका करणारेही दोन लोकं असतात. पण त्या टीकेने विचलीत न होता, आपण आपले काम करत राहणे महत्त्वाचे असते, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे.