कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आज देशात सीबीआय, ईडी या गैरव्यवहार चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे येथे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हिंडणबर्ग अहवाल आल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध जाहीर करा असे संसदेत मागणी करतात. मात्र, त्यांचे भाषण पटलावरून बेकादेशीररित्या काढून टाकले जाते.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक वक्तव्य केले होते त्यावरून त्यांना तात्काळ गुजरात न्यायालयाकडून मानहानीचा खटल्यात शिक्षा सूनविण्यात आली. त्यानंतर त्यांना अपात्र करण्यात आले आणि खासदारकी रद्द करण्यात आली.
विमानतळे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि ज्यांना अनुभव नाही, अशा अदानी यांना सहा विमानतळे देण्यात आली. देशाच्या 30 टक्के विमान वाहतुकीची कंत्राटे अदानी यांना देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रात ही त्यांना अनेक ठिकाणी कंत्राट देऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे. मोदी नेमके कशाला घाबरतात याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.लोकशाही गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी कोणाची मानहानी केली नाही. गांधी यांचा आवाज कसा बंद करता येईल, सदस्यत्व रद्द करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून दिशाभूल करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/163905949918198
मोदी आणि अदानी यांच्यात काही संबंध नसतील तर तसे मोदी यांनी जाहीर करावे. अदानी यांच्या परदेशातील मॉरेशिस येथील कंपनीत 20 हजार गुंतवणूक, पवनचक्की कंत्राट, कंपनी समभागची वाढवलेली किंमत याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील, असे चव्हाण यांनी म्हंटले.