हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १४ जानेवारी २०११ मध्येही कंत्राची भरतीचा जीआर काढल्याचे फडणवीस यांनी म्हंटले होते. त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीस आम्हाला ज्या जीआरबाबत विचारत आहेत. या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे कि सप्टेंबरला जो कंत्राटी भरतीचा जीआर त्यांच्या सरकारने काढला. तेव्हा तुम्ही काय गुंगीत होता का? जनतेचा रेटा सुरु झाल्यानंतर घाईगडबडीत तुम्ही तुमचाच सप्टेंबरमध्ये काढलेला सप्टेंबर २०२३ चा जीआर रद्द केला आहे. जीआर रद्द करायचा होता तर तो का काढला?, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
नांदेडसह इतर ठिकाणी जिल्हा रुग्णालयात मृत्यूच्या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अपुरी असणारी वैद्यकीय डॉक्टरांची संख्या, रुग्णालयात असणाऱ्या इतर सुविधा व समस्या याचा प्रभारी वैधकीय अधिक्षक राजेश शेडगे यांच्याकडून आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. चव्हाण यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, जावेद शेख, शुभम लादे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, राज्यातील सुरक्षा व आरोग्य यंत्रणा ढासळलेली आहे. एका मागोमाग एक जिल्हा रुग्णालयात अपघात होतायत. या पार्श्वभूमीवर आज कराडच्या रुग्णालयास भेट दिली. सर्वात मोठा प्रश्न आहे कि कराडचा काय राज्याचा काय? राज्य शासनाने पदे भरण्यामध्ये फार गलथानपणा केलेला आहे.
शासनाकडून पैसे वाचविण्याचा प्रयत्न चाललेला आहे.सगळं कंत्राटीकरण चाललेलं आहे. आणि जोपर्यंत पूर्णवेळ, जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होत नाही तोपर्यंत अजून किती दिवस असं चालणार आहे. आरोग्य यंत्रणेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष शासनाचे झाले आहे. आता आम्हाला विधानसभेत त्यावर आवाज उठवावा लागणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1364299954483377
कराड येथील रुग्णालयाच्या भेटवेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रुग्णालयाची दुरुस्ती करावी, क्रोमा सेंटरबाबत प्रस्ताव सादर करावे, अत्याधुनिक रुग्णवाहिका, रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी करावी, रुग्णालयात अत्याधुनिक अशा स्वरूपाचे काम करावे, रुग्ण तपासणीसाठी नविन ओपिडी ब्लॉक च प्रस्ताव सादर करावा, सर्वात अगोदर रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना केल्या.
रुग्णालयात १६४ बेडद्वारे उपचार सुरू…
कराड येथील वेणूताची चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय असून सध्या १६४ बेड द्वारे रुग्णणार उपचार सुरू आहेत. अजून ५० बेड मंजुरीसाठी अवश्यकता आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याबाबत आ. चव्हाण यांनी सूचना केल्या.
रुग्णालयातील ‘या’ आहेत मुख्य समस्या अन् अडचणी…
१) स्वच्छता सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी किमान १४ स्वच्छता सेवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी
काहीतरी ठोस उपाययोजना नाहीत.
२) कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे मे-२३ पासून सप्टें २३ अखेर (५ महिन्याचे) वेतन अनुदान प्राप्त नाही.
३) तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्ण तपासणीमध्ये अडचणी.
४) नियमित डयूटी करण्यांसाठीसुद्वा फक्त ५ वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध आहेत. त्यांनाच व्हीआयपी
दौरे/इमर्जन्सी डयूटी/ओपीडी डयूटी नसल्याने गैरसोय
५) ३ रुग्णवाहिका आणि फक्त १ च कंत्राटी तत्वावर वाहनचालक उपलब्ध आहे. फक्त सोमवार/मंगळवार करिता पाटण येथील वाहनचलकाची नियुक्ती. त्यामूळे १ वाहन विनावापर पडून असते. त्यामुळे रुग्ण सेवेत
अडथळा निर्माण होतो.
६) रुग्णवाहिके अभावी रुग्णांना (बाळंतपण) ने-आण सुविधा पूर्ण ताकदीने देता येत नाहीत.