हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. पण तेव्हा काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
2014 लाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. त्यावेळी आकडेही तसेच होते. पण मी स्वतःच म्हंटल की हे शक्य होणार नाही , कारण शिवसेनेबाबत आमचा जो ग्रह होता ते पाहता काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावं हा विचार आम्ही पुढे सरकवला नाही. आमच्या काही लोकांनी दिल्लीपर्यंत हा प्रस्ताव पाठवला असला तर मला याबाबत माहिती नाही पण माझ्यापर्यँत हा प्रस्ताव आला तेव्हा मी तिथेच तो संपवून टाकला.
पण नंतरच्या 5 वर्षातील सत्तेच्या काळात भाजपने जो धुमाकूळ घातला त्यानंतर आम्ही आमंच मत बदलले. महाराष्ट्राने तीन पक्षांचे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते. तेव्हा 3 पक्षाचे सरकार कस चालवायचं हा प्रश्न होता. कारण दोन पक्षाचे सरकार चालवताच आम्हाला अनेक अडचणी येत होत्या आणि त्या मी अनुभवल्या आहेत. त्यामुळे हे सरकार यशस्वी होईल का यावर प्रश्नचिन्ह होत. पण आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम केला आणि सरकार स्थापन केलं. अडीच वर्ष हे सरकार व्यवस्थित चाललं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.