कराड दक्षिण मधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांची उमेदवारी जाहीर

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनधी | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघातून काँग्रेस कडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेस पक्षाने ५१ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली होती त्यामध्ये अनेक दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली होती. आज ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली. यामध्ये सांगलीतून पृथ्वीराज देशमुख तर लातूरमधून धीरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कराड दक्षिण मधून भाजप कडून अतुल भोसले निवडणुक रिंगणात आहेत. तसेच माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढणार आहेत. त्यामुळे कराड दक्षिण मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here