कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
“गेल्या काही दिवसांपासून भारतात जे काही वातावरण आहे विशेषतः प्रसार माध्यमांच्या विरोधात एक जो दहशतवाद चाललेला आहे. त्यातून माध्यमांशी गळचेपी करण्याचे काम सुरु आहे. ज्या बीबीसी या इंग्लंडमधील वृत्त वाहिनीने 2002 च्या घटनेतील एक माहितीपट नवीन माहितीच्या आधारावर एक माहितीपट दाखवला होता. परंतु तो माहितीपट भारतात प्रसिद्ध करण्याकरिता मोदी सरकारनेच त्याला बंदी घातली. आणि काही थोड्या दिवसात बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे टाकले गेले. हे एक प्रकारे गळचेपी करण्याचे दहशत निर्माण करण्याचे उदाहरण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीबीसीवर करण्यात आलेल्या कारवाई हि चुकीची आहे. पंतप्रधान मोदींचा माहितीपट प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही दिवसात बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. वास्तविक सगळ्या वृत्तवाहिन्या विकत घेत स्वतःचा एक व्यक्तिगत प्रचाराचे साधन केले आहे.
देशात सध्या दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचे काम; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल pic.twitter.com/Saddf1wPxC
— santosh gurav (@santosh29590931) March 8, 2023
राहुल गांधी म्हणाले, केंब्रिज विद्यापीठात बोलायचं स्वातंत्र्य आहे भारतात नाही. ते योग्यच बोलले आहे. भारतात दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे. यातून मिडियाची गळचेपी करण्याचं काम सुरू आहे. काही दिवसापूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्याच्या अटकेमुळे भारतात हुकुमशाहीची चाहूल लागलेली असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले.