कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढणार का? अशी शंका व्यक्त केली जात होत. मात्र, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्हीही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याचे मोठे विधान केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पुण्याच्या कसबा निवडणूकीचा जो निकाल लागला आहे. आणि जो मतदारसंघ तब्बल 32 वर्षे भाजपाच्या ताब्यात होता. तो त्यांना गमवावा लागला. महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी दणदणीत विजय झाला. हा जो प्रयोग चालला आहे महाविकास आघाडीचा जातीवादी पक्षांना रोखण्याचा जो यशस्वी होताना दिसत आहे.
कसबा म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला, गड आहे. त्याठिकाणी भाजपमधील अंतर्गत विरोधही पुढे आला आहे. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवून विजय खेचून आणला आहे. हि महाराष्ट्राच्या भावी राजकारणाकरिता अत्यंत महत्वाची घटना आहे.
महापालिका – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'मविआ' एकत्रित लढणार; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान
कराडात पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर टीका pic.twitter.com/mq9JOzUkuZ
— santosh gurav (@santosh29590931) March 7, 2023
तसेच या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किव्हा महापालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये हा प्रयोग आम्ही एकत्रितपणे यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित त्यामुळेच या निवडणुका जवळ वर्षभर लांबलेल्या आहेत. या निवडणुका घ्यायचे धाडस शिंदे फडणवीस सरकारमध्ये नाही हे स्पष्ट झाले आहे. काहींना काही तरी करणे सांगून या निवडणुका पुढे जातायत. कदाचित विधानसभेपर्यंत तरी या निवडणुका होतील का नाही अशी शंका वाटत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी म्हंटले.