गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करत मोठा झटका दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवत आपली नाराजी जाहीर केली आणि काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आझाद यांचा राजीनामा दुर्दैवी आहे असं म्हंटल आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना दिलेले पत्र मी वाचले आहे. त्यांनी पत्रात जे काही म्हंटल तेच आम्ही G २३ च्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी एका गोपनीय पत्राव्दारे म्हंटल होते. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडून आलेले सदस्य असावेत, अशी आमची मागणी होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 24 वर्षात कोणतीच निवडणुक न झाल्यामुळे कोणतेच सामुदायिक निर्णय घेण्यात आले नाहीत असे त्या गोपनीय पत्रात नमूद करण्यात आले होते, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हान म्हणाले. गुलाम नबी आझाद यांच्या सारखा सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी असून पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे. अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली .

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी पत्र लिहीत सोनिया गांधींकडे आपला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला . अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. असं त्यांनी आपल्या पत्रात म्हंटल. तसेच आपण भाजपमध्ये जाणार नाही तर नवा पक्ष स्थापन करणार आहे अशीही घोषणा त्यांनी राजीनाम्यानंतर केली आहे.