राज्यपालांना वादात पडण्याची हौस म्हणून…; कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे होती. वास्तविक त्यांना वादग्रस्त विधाने करून वादात पडण्याची हौस होती का? अशा प्रकारची अनेक कारणे आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी आज मंजूर केला. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून अनेकवेळा करण्यात आली. तसे पाहिले तर राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आणि त्यांना स्वतः चे फार अधिकार नाहीत.

एक संविधानिक पद आहे. तरी या पदावर असलेल्या व्यक्तीने सरकारमधील कामकाजात हस्तक्षेप करणे हे अपेक्षित नाही. परंतु कोश्यारी स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. ते अनेक वर्षे राजकारणातही होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून बाहेर जाऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात आल्यावर देखील त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केली. आणि स्वतः वर आक्षेप ओढवून घेतला.

तसे पाहिले तर राज्यपालांवर कधीही कोणी टीका टिप्पणी करत नाही. किव्हा त्यांच्यावर आक्षेप घेत नाही. मात्र, त्याला हे राज्यपाल अपवाद ठरले. अनेक महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विरोधामध्ये त्यांनी नीट माहिती न घेता कारण नसताना बेजबाबदार वक्तवे केली. दुरसी गोष्ट महाविकास आघाडी सरकारने जे बारा व्यक्तींना राज्यपालांनी १२ व्यक्तींना विधान परिषदेवर नेमावे यासाठी विनंतीही केली होती. तसेच कॅबिनेटच्या ठरावही पाठवला होता. मात्र, त्यावर त्यांनी कार्यवाहीच केली नाही. त्यातून जवळपास १५ महिन्यांहून अधिक कालावधीत आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आली. हे एक महत्वाचे आक्षेपाचे कारण राजीनाम्याच्या मागणीमागचे होते.

महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर जेव्हा शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेवर येत होते तेव्हा राज्यपालांचे निर्णय, वर्तन वादग्रस्त, आक्षेपार्ह ठरले. त्यांना वादात पडण्याची हौस होती का? किव्हा आपण सततप्रसिद्धीच्या झोतात, चर्चेत राहिले पाहिजे. याचा हव्यास होता. परंतु त्यांनी राज्यपाल पदाची गरिमा असते ती नष्ट केली असे म्हणावे लागेल. आणि इतके दिवस त्यांचा राजीनामा एका स्वीकारण्यात आला नाही? याचे उत्तर मात्र, केंद्रातील मोदी सरकारने आता द्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.