हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्रात भाजप विरोधात विविध पक्ष तसेच आघाडींतील नेत्यांकडून आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. भाजप विरोधात असणारा काँग्रेस पक्ष हा मजबूत असल्याने या पक्षाच्या अध्यक्षपदाची लवकर निवड करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षात तयारी केली जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनीच स्वीकारावे, अशी पक्षातील सर्वांची इच्छा आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून माध्यमांना महत्वाची माहिती दिली. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधीच योग्य असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील लोक काम करण्यासाठी पसंती दाखवत नाहीत. अध्यक्षपदासाठी हिंदी चांगल्या प्रकारे येणे गरजेचे असते. राहुल गांधी यांनी एक वर्षांपूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापासून अध्यक्षपद रिक्त आहे. मीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहले होते. हंगामी अध्यक्ष म्हणून सोनियाजींनी काम करायचे होते. तसेच या प्रश्नी त्यांची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र, माझ्या पत्राचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढला गेला.
देशातील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीच व्हावे अशी आमची इच्छा आहे. मात्र, राहुल गांधी यांचा अध्यक्ष होण्यासाठी विरोध होता. त्यामुळे आम्ही पक्षाध्यक्षांची भेट घेण्याचे ठरवले. तसेच त्यांची भेटही मागीतली होती. मात्र, ती होऊ शकली नाही. मोदी-शहांशी लढताना काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी ठेऊन ठेऊन चालणार नाही. त्यामुळे राहूल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.