हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले असून त्यांना पंतप्रधान करा अस मोठं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं होत त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
भाजपचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी म्हणत नाही. तर आकडेवारी सांगत आहे. मी आकडे मांडली आहे. ते मुख्यमंत्री असतांना काय निर्णय घेतले? हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
महागाई मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असतांना पेट्रोल डिझेल आणि गॅसवर करवाढ करून दरवाढ केली आहे. मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. असा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहे. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. एकनाथ खडसे आधी भाजप मध्ये होते. नंतर त्यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं? असा सवाल देखील त्यांनी केला.