लवकरच प्रिया प्रकाशचा नवीन चित्रपट, काय आहे भूमिका ? जाणून घ्या

0
52
Priya Prakash variyar
Priya Prakash variyar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फिल्मी दुनिया | मागील काही दिवसांपूर्वी डोळा मारून अनेकांना भुरळ घालणारी प्रिया प्रकाश वारीयर लवकरच ‘श्रीदेवी बंग्लो’ या चित्रपटाने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करत आहे.

एक व्हिडिओ क्लिप समोर आली आणि लाखोंच्या संख्येने प्रियाचे चाहते झाले. भारतातील आणि इतर देशातील तिच्यावर अनेक चाहते फिदा आहेत. अवघ्या १९ वर्षाच्या प्रियाचे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण होत असल्याचे ‘श्रीदेव बंग्लो’ येणाऱ्या या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे.

आश्चर्य म्हणजे ‘श्रीदेवी बंग्लो’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, ना प्रियाचा एक डायलॉग ना दुसरी कुणाची भूमिका पाहायला मिळतं. ट्रेलरमध्ये फक्त एक संगीत ऐकु येते आणि एकटे राहत असलेली प्रिया कुणाच्या तरी सपोर्टच्या शोधात असलेली पाहायला मिळते. प्रिया ‘स्विमिंग’, ‘रनिंग’, ‘ड्रिंकिंग’ करते आणि एकटी एकटीच राहते.

‘श्रीदेवी बंग्लो’ चित्रपटात प्रियाची मुख्य भूमिका असल्याचे आताच आलेल्या ट्रेलवरून समजते. चित्रपट अजून प्रदर्शित होणार आहे, त्याआगोदरच प्रिया प्रकाश काम करत असलेल्या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here