प्रियांका चोप्राच्या संसाराला लागलं ग्रहण; पती निकने स्वतः Video पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती

0
263
Priyanka Chopra Nick Jonas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन पॉप गायक निक जोनास याच्याशी विवाह केला. दोघांचा संसार चांगला चालला असताना आता त्यांच्या संसाराला ग्रहण लागले आहे. ते म्हणजे निक जोनासला एक गंभीर आजार जडला असून वयाच्या 13 व्या वर्षांपासून त्याला हा आजार सतावतो आहे. जेव्हा निक 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला समजलं होतं कि त्याला डायबिटीज आहे, याबाबत आता त्याने स्वतः व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

प्रियांका आणि निक यांनी 1 डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले. काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकने एकत्र दिवाळी साजरी केली होती. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता प्रियांकाचा पती निकने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याला झालेल्या आजाराबाबत माहिती दिली आहे.

निक जोनस वयाच्या 13 वर्षांपासून टाईप 1 प्रकारातील डायबिटीज सुरु झाली होती. नुकतेच स्वतः निकने त्याच्या डायबिटीज आणि त्याच्या लक्षणांविषयी एका व्हिडिओमध्ये सांगितले होते. त्याच्या डायबिटिजविषयी अनेक महत्वाच्या माहिती त्याने या व्हिडिओमधून दिली आहे.

https://www.instagram.com/reel/Ck3Z0OVLtoH/?utm_source=ig_web_copy_link

निकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर त्याच्या फॅन्सकडून कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.