12वी च्या विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवणे योग्य नाही, CBSE परीक्षेवरून प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12वी परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. 10वी ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बारावी साठी देखील अंतिम निर्णय घ्यायला हवा असे म्हंटले आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंट वरून ट्वीट केले आहे.

त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, ‘सरकारने शेवटी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत याचा आनंद झाला तरी बारावीसाठीही अंतिम निर्णय घ्यावा लागेल. जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अनावश्यक दबावाखाली ठेवण्यात काहीच अर्थ नाही.हे अयोग्य आहे. मी सरकारला आत्ताच निर्णय घेण्यास उद्युक्त करते ‘ असे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

दरम्यान यापूर्वी प्रियंका गांधी यांनी सीबीएसई परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी अनेकदा ट्वीट करत या परीक्षांबाबत सरकारला सूचित केले होते. अखेर सरकारने सीबीएसई ची दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले होते की,’मी अनेक दिवसांपासून बर्‍याच सीबीएसई विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या भीतीदायक स्थितीत मुलांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर चर्चा केल्याशिवाय कोणतीही चर्चा पूर्ण नाही. पंतप्रधान, शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांची मने ऐका. जिद्दी सोडून द्या’ अशा आशयचे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केले होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment