जगातील सर्वात मोठ्या कोळसा कंपनीचे उत्पादन घटणार ! चालू आर्थिक वर्षात 60 कोटी टनांपेक्षा कमी राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी (Coal Mining Company) असलेल्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) च्या उत्पादनात सलग दुसर्‍या वर्षी घट होण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात कोळशाच्या उत्पादनात (Coal Production) 50-60 लाख टन टन्सची थोडीशी घसरण होऊ शकते. यावेळी कोल इंडियाचा अंदाज आहे की, कोळशाचे उत्पादन 60 कोटी टनांच्या खाली जाईल. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीच्या कोळशाचे उत्पादन 60.2 कोटी टन होते.

कोरोना संकटाच्या वेळी मागणी कमी झाल्यामुळे उत्पादनात घट
कोल इंडियाने 2018-19 या आर्थिक वर्षात 60.69 कोटी टन उत्पादन केले, जे त्याचे सर्वाधिक उत्पादन (Highest Production) होते. चालू आर्थिक वर्षात कंपनीने 66 कोटी टन उत्पादनाचे लक्ष्य (Production Target) ठेवले होते. आर्थिक वर्षाच्या मध्यभागी कंपनीने अशी आशा केली होती की, त्यांचे उत्पादन 63 ते 64 कोटी टनापर्यंत होईल. कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,” कोरोनाव्हायरस (Coronavirus Crisis) मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उत्पादनावर वाईट परिणाम झाला आणि तो कमीच राहिला. वास्तविक, कोरोना साथीमुळे मागणी कमी झाली. यामुळे कंपनीकडे कोळशाचा साठा जमा होत राहिला. यामुळे कंपनीचे उत्पादन कमी झाले आहे.”

फेब्रुवारीच्या अखेरीस कोळसा साठा 7.78 कोटी टनांपर्यंत पोहोचला
27 मार्च 2021 पर्यंत कोल इंडियाचे उत्पादन 58.5 कोटी टन झाले आहे. मार्चच्या उर्वरित चार दिवसांत 1.1 कोटी टन कोळशाचे उत्पादन होईल. अशाप्रकारे, कंपनीचे एकूण उत्पादन (Total Coal Production) 59.6 ते 59.7 कोटी टन्स एवढे असेल, जे निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी असेल. सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोळशाची उचल 57.7 कोटी टन होण्याची शक्यता आहे. कोल इंडिया जवळील कोळश्याचा साठा फेब्रुवारी 2021 अखेर वाढून 7.78 कोटी टन झाला आहे. त्याच वेळी, जानेवारी 2021 च्या अखेरीस कंपनीकडे 6.68 कोटी टन कोळश्याचा साठा होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group