पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अखेर उमेदवारी जाहीर झाली असून दिवंगत नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके याना आमदारकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पार्थ पवार यांच्या नावासाठी आग्रही होते असेही ऐकण्यात आले मात्र अखेर भगीरथ भालके यांना ही उमेदवारी मिळाली.

जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा

दरम्यान पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना असून भाजपने या निवडणुकीत समाधान अवताडे यांना तिकीट दिले आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment