Wednesday, March 29, 2023

समुद्र किनारपट्टी भागातील 5 जिल्ह्यात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला महापुराचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दरडी कोसळून जिवीतहानी झाली तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. याच पार्श्वभूमीवर इथून पुढे अशा घटना होऊ नये म्हणून ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय ठाकरे सरकार घेणार आहे. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट देऊन लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर ते पूरग्रस्त चिपळूणच्या बाजारपेठ मध्येही गेले होते. आज ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार होते पण खराब हवामानामुळे त्यांचा आजचा दौरा रद्द झाला.