सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अगोदरच कोरोचा प्रसार होत आहे. त्यामुळे रोजगार, धंदे बंद ठेवावे लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. अशात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅस आदींची दरवाढ केली जात आहे. या दरवाढीच्या विरोधात शनिवारी सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी “दरवाढीच्या नावाखाली खूप केली लूटमार, आता मोदी सरकारवर जनताच करणार पलटवार” भाजप सरकारचा धिक्कार असो, भाजप हटाव, अशा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
मोदी सरकारच्यावतीने वारंवार पेट्रोल व गॅसचे दर वाढविले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या मोदी सरकारच्या पेट्रोल दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर एकत्रित येत आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध नोंदविला.
मोदी सरकारच्यावतीने वारंवार पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढविले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारने हि दरवाढ कमी करावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आली. तसेच मोदी सरकारच्या या गॅस दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला.