हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या अनंत चतुर्थी आणि गणेश विसर्जनाची सार्वजनिक सुट्टी आहे. परंतु राज्य सरकारने ईद – ए – मिलादनिमित्त शुक्रवार देखील सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. मुस्लिम बांधवांसाठी ईद – ए – मिलाद हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिनानिमित्त सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, गणेश विसर्जनाची ही सार्वजनिक सुट्टी उद्या राहणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.
मुख्य म्हणजे, 28 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात प्रचंड गर्दी जमा होईल. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन देखील 29 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती. या विनंतीनंतरच 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1706995754190229959?t=wI3-4cObdObPBF2dzY07mg&s=19
दरम्यान, राज्यात गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एका पाठोपाठ आले आहेत. त्यामुळे राज्यात गर्दीचे प्रमाण जास्त असेल. या काळात काही तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त राबवण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनाब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन दिवसात पोलीस यंत्रणेवर सर्वात जास्त कामाचा भार पडणार आहे. त्यामुळे या काळात दोन्ही सणांचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी सरकारने शुक्रवारची सुट्टी जाहीर केली आहे.