लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, विमानतळ पोलिस ठाण्यात FIR दाखल

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पहिले लग्न झाले असल्याची माहिती लपवून त्याने 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने तिच्याशी एका ठिकाणी जाऊन लग्न देखील केले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जसविंदर सिंह असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध 32 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्या महिलेची व आरोपीची पहिल्यापासून ओळख होती. यानंतर आरोपीने त्या महिलेशी ओळख वाढवून तिच्याबरोबर लग्न करणार असल्याचे आमीष दाखवले. मात्र त्याचे पहिले लग्न झाले होते. व त्याला 2 मुलेदेखील आहेत. हि गोष्ट त्याने फिर्यादी महिलेपासून लपवून ठेवली होती. तसेच त्याने भडजीला घेऊन दोन साक्षीदार यांच्यासमोर फिर्यादी महिलेसोबत लग्नदेखील केले होते.

यानंतर आरोपीने फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केले आहेत असे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विमानतळ पोलिसांकडून करण्यात येत आहे.