हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. नुकताच सरकारने आता पुणे ते बेंगलोर असा आठ पदरी एक्सप्रेस वे (Pune Bangalore Expressway) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेस वे च्या माध्यमातून नागरिकांचा पुणे ते बेंगलोर प्रवास सोप्पा होणार आहे. पुणे ते बेंगलोर असा एक्सप्रेस वे उभारण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. पुणे ते बेंगलोर एक्सप्रेसवेच्या निर्णयावर 2019 सालीच शिक्कामोर्तब झाला होता. 2019 काळात या एक्सप्रेसवेचे डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत या एक्सप्रेसवेवर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात येत आहे.
पुणे ते बेंगलोर एक्सप्रेसचे 2 टप्पे आहेत. त्यातील पहिला टप्पा महाराष्ट्रातून तर दुसरा कर्नाटकातून जातो. मुख्य म्हणजे, सध्या पुणे ते बेंगलोर हा सहा लेनचा असून आता तो आठ लेनचा करण्याचा विचार सरकार करत आहे. तश्या पद्धतीने या एक्सप्रेसवे ची रचना देखील करण्यात आली आहे. त्यानुसार, हा एक्सप्रेस वे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस असणार असून त्याचे एकूण लांबी 702.43 किलोमीटर आहे. तसेच त्याची बाहेरील बाजू रुंदी 100 मीटर आणि आतील बाजू 50 मीटर अशी ठेवण्यात आली आहे. भविष्यात जर हा एक्स्प्रेस वेळ वाढवण्यात आला तर तो वाहने 120 किलोमीटरने धावू शकतील असा बनवला जाईल. या पुणे ते बेंगलोर एक्सप्रेस वे प्रकल्पावर सरकार तब्बल 55 कोटी खर्च करेल.
पुणे ते बेंगलोर अवघ्या 7 तासांचा प्रवास – (Pune Bangalore Expressway)
सध्याच्या घडीला पुणे ते बेंगलोर अंतर 840 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे पुण्यातून बंगलोरला जाताना तब्बल 15 ते 18 तासांचा कालावधी लागतो. परंतु नवीन उभारण्यात येणाऱ्या एक्सप्रेस वेळमुळे पुणे ते बेंगलोरचे अंतर अवघ्या 7 तासात पूर्ण करता येणार आहे. तसेच मुंबईवरून बेंगलोर ला जायचे असेल तर आपण फक्त दहा तासात हे अंतर पार करू शकतो. हा एक्सप्रेस वे तयार करण्यापूर्वी सर्व बारीक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ज्यामध्ये आजूबाजूचा परिसर कसा असावा, आर्थिक दृष्ट्या या एक्सप्रेस वे चा फायदा कसा होईल, या सगळ्यांचा विचार केला गेला आहे. या एक्सप्रेस वेची उभारणी झाल्यानंतर रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
पुणे–बेंगलोर एक्सप्रेस वेची माहिती
नव्याने उभारण्यात येणारा आठ पदरी पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे (Pune Bangalore Expressway) महाराष्ट्र ते कर्नाटक अशा दोन राज्यांमधून जाणार आहे. महाराष्ट्रातून जाणारा मार्ग हा पुणे, सातारा आणि सांगली पार करून कर्नाटकमधील बेलारावी, बागलकोट, गडक, विजयनगर, देवनगिरी, चित्रदुर्गा, तुमकुरु आणि बेंगलोर अशा नऊ जिल्ह्यातून बेंगलोर पर्यंत पोहोचेल. यामध्ये, पुणे रिंग रोडपासून सुरू होणारा एक्स्प्रेस वे , फलटण, कोरेगाव, खटाव, खानापूर, तासगाव अशा शहरांमधून जाऊन मिरज तालुक्यातील सालाग्रे गावाजवळ महाराष्ट्रात येऊन संपेल.
मुख्य म्हणजे, ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे 702 किलोमीटर एवढा असेल. ज्यामध्ये, 6 ओव्हर ब्रिज, 42 मुख्य पूल, ७२ बॉक्स टाईप पूल, 59 अंडरपास, 59 लहान अंडरपास, 45 ओव्हर पास, 45 रेगुलर ओव्हर पास, 35 इंटरचेंजेस या सर्व गोष्टींचा समावेश असेल. तसेच सुरक्षितेचा विचार करून या एक्सप्रेस वेवर कॉलिंग बूथ, सीसीटीव्ही कॅमेरे, टोल प्लाजा अशा सर्व सोयी प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्या जातील.
एक्सप्रेसवे उभारण्यासाठी लागणारी सामग्री आणि खर्च
पुणे–बेंगलोर एक्सप्रेस (Pune Bangalore Expressway) उभारण्यासाठी तब्बल 40 लाख पेक्षा जास्त सिमेंट, 40 लाखपेक्षा अधिक वाळू, 2 लाख पेक्षा मॅट्रिक्ट टनापेक्षा जास्त स्टील, 1 करोड बोल्डर, 1 करोड पेक्षा जास्त माती लागणार आहे. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधून आपण हा विचार नक्कीच करू शकतो की हा एक्सप्रेस वे किती मोठा असेल. या एक्सप्रेस वेवर 55 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, लवकरच या एक्सप्रेस वेचे काम सुरू करण्यात येणार असून 2018 पर्यंत हा एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.