कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार सुसंस्कृत पुण्यात घडला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात सच्चाई माता परिसरात एका घरात इस्टेट एजंटचा मृतदेह आढळण्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची चौकशी सुरु केली आहे.

अजय जयस्वाल (वय ४२, सध्या राहणार कोथरूड) या इस्टेट एजंटचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हा इस्टेट एजंट मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी आहे. या खूना संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद कऱण्यात आला आहे.

इस्टेट एजंट असणारा अजय जयस्वाल हा सावकारी देखील करत होता अशी माहिती समोर अली आहे. काल पासून तो त्याच्या कडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा फोन उचलत नव्हता म्हणून कर्मचारी कात्रजच्या सच्चाई माता परिसरात आपल्या मालकाला शोधायला आला. अजय जयस्वाल याचे कात्रज परिसरतात देखील एक घर असल्याने त्याचा कामगार त्याला तेथे शोधण्यास आला होता. मात्र त्याला कुलूप बंद घराच्या खिडकीतून रक्ताने माखलेले अजय जयस्वालचे प्रेत दिसले तेव्हा सर्व प्रकार उघड झाला. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.