पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्येच अजून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे पुणे पोलिसांचा चोरट्यांवर काहीच धाक राहिला नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. अशीच एक चोरीची घटना लोहगावामध्ये घडली आहे. यामध्ये चोरटयांनी सराफ व्यवसायकाच्या गळ्याला कोयता लावून त्याला लुटले आहे.
या चोरटयांनी व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने लुटले आहे. ही घटना लोहगाव परिसरात घडली आहे. याविरुद्ध व्यवसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुण्यात सराफाच्या गळ्याला कोयता लावून ज्वेलरी शॉपमध्ये चोरी pic.twitter.com/ZJ4tbhD5pX
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 6, 2022
काय घडले नेमके ?
घटनेच्या दिवशी आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरले. एकाने सराफ व्यवसायकला कोयत्याचा धाक दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी त्याला पकडून ठेवले. यावेळी दरोडेखोरांनी सराफाला जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या लांबल्या. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.