उच्च मधुमेहाला कंटाळून पुण्यात तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आजारपणाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हि घटना घडली आहे. उच्च मधुमेह आजाराला कंटाळून त्याने हि आत्महत्या केली आहे. गणेश मनिकम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत गणेश मनिकम बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी नोंदवली होती. गणेशने घरातून जात असताना मी आत्महत्या करायला जात आहे, असे म्हंटले होते. त्यावरून पोलिसांनी गणेशने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. अमरजाई देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळून आला. उच्च मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आजारपणाला कंटाळून गणेश मनिकम याने आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हि घटना घडली आहे. मृत गणेशला उच्च मधुमेह आजाराने ग्रासले होते. हाय डायबिटीजमुळे तो खूप वैतागलेला होता.

देहूरोड पोलीस स्टेशनला एक अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अमर जाई देवी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस डोंगराच्या पायथ्याशी झाडाला लटकून आहे अशी खबर मिळताच देहूरोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन त्याच्या कपड्यांचा रंगावरून हा इसम बेपत्ता असलेला 42 वर्षीय गणेश मनिकम आहे असा अंदाज वर्तवला. यानंतर पोलिसांनी गणेशच्या घरच्यांना बोलावून त्या मृतदेहाची शहानिशा केली असता हा मृतदेह गणेशचच असल्याचे स्पष्ट झाले. गणेश याला हाय शुगर चा आजार होता व या आजाराला व त्याच्या त्रासाला कंटाळून तो घरातून निघून गेला होता निघून जात असताना गाईच्या वासरु बांधणारी रशी तो सोबत घेऊन गेला होता व मी आत्महत्या करायला चाललो आहे असं घरच्यांना बोलून गेला होता. यानंतर पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नव्हता.

Leave a Comment