पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद!

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अशा वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुलटेकडी भागातील मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला, कांदा-बटाटा, फळे, केळी बाजार पुढील सूचना येईपर्यंत उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उर्वरित पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे अशी माहितीही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इतर महत्वाच्या बातम्या –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here