उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का! ‘या’ नेत्याच्या मुलीचा शिवसेनेत प्रवेश

Meghana Kakde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार, 12 खासदार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पक्षातून बंड केले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यासोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर शिंदें गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही पक्षामध्ये वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी देत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच (NCP) धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मेघना काकडे माने यांनी मातोश्रीवर हातात शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन आहिर, आदेश बांदेकर हे नेते उपस्थित होते.

कोण आहेत अंकुश काकडे?
अंकुश काकडे हे पुण्याचे माजी महापौर होते, अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सक्रीय असून सध्या ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. अंकुश काकडे यांच्या कन्येचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश होत असतानाच ते सरकारवर निशाणा साधत आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अंकुश काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ‘सत्तारला माफी मागायला सांगा, नाही तर त्याचं काय करायचं ते आम्ही करू,’ असे ट्विट करून हा इशारा दिला आहे.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी