मोठी कारवाई! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी घेतलं 2 जणांना ताब्यात

Pooja chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे.यामध्ये एक जण हा या प्रकरणातील संशयित अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे.