पुणे : दिवाळीसाठी घरी निघालेल्या प्रवाशाचा रेल्वे स्टेशनवर मृत्यू; गर्दीने तुडवले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : पुण्यात रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दिवाळी निमित्त घरी जात असताना दम्याच्या त्रासाने बेशुद्ध पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बॊद्धा मांझी असे असून तो मूळचा गया (बिहार) येथील रहिवासी आहे. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती. याचवेळी दम्याच्या त्रासाने सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आज दानापूर एक्स्प्रेसने साजन बलदेवन यादव (वय – 30 वर्षे) व त्याचा पुतण्या बौधा मांझी असे रा. मूळगाव – गया, बिहार हे गेले 15 दिवसापूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते, मयत इसम हा आजारी होता. सदर गाडीत चढत असताना त्याला पूर्वीपासून दम्याचा त्रास असल्याने त्यास अचानक जोरात खोकला येवून जीव घाबरा झाला म्हनून त्यास त्यांचे नातेवाईक यांनी खाली उतरवून मोकळ्या हवेसाठी flatform बाहेर घेवून आले व त्यानंतर तो इसम खाली पडून बेशुद्ध झाला. यानंतर पोलिस यांनी रेल्वे स्टेशन वरील डॉक्टर यांनी बोलावून तपासले असता त्यास मयत घोशित केले आहे. नमूद इसमास कोणत्याही मारहाण अथवा दक्कबुक्की ची खुणा नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री पुणे दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना सदर प्रवाशाला दम्याचा त्रास झाला. त्याला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला. मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले (Pune Railway Station)

बोधा मांझे असे या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवाशी मूळचा बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जण्यासाठी निघाला होता.