पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सगळीकडे चोरीचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरात एका कपड्याच्या दुकानात चोरी केली. यामध्ये आबूशेट रोडवरील फॅशन पॉईंट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी कपड्यांचे संपूर्ण दुकान लुटले. हे चोरटे चोरी करत असताना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे कि, आरोपी एका रिक्षातून आले आणि दुकानाचे शटर उघडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. हे चोरटे मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरी करण्यासाठी आले होते. हे चोर गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि 70 हजाराचे कपडे घेऊन फरार झाले आहेत. मात्र चोरी करतानाची घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी दुकानाच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस हे सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1488765900547592192
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत दिवसाढवळ्या चोरी झाली होती. या चोरटयांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असतांना 16 ते 17 लाखांची रक्कम लंपास केली. हि घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली होती. या चोरटयांनी 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून त्या ठिकाणाहून पळ काढला. या आरोपींसोबत एक महिलासुद्धा असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.