पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे याचा छत्रपती संभाजीनगर करांना फायदा होणार आहे.

श्रीरंग आप्पा बारणे यांनी केली विचारणा

लोकसभेमध्ये शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी नितीन गडकरींना प्रश्न केला त्यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पुणे- चाकण या परिसरात वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे चाकण- तळेगाव ते शिंगणापूर पर्यंत एक उन्नत (एलिवेटेड) मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बीओटी तत्त्वावर बांधला जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे.

वाहतूक कोंडीवर लागणार ताळ

या नवीन मार्गामुळे पुणे, चाकण, तळेगाव, छत्रपती संभाजीनगर या भागातील होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवासासही फायदा होणार आहे. तसेच सध्या देशामध्ये एकूण 960 किलोमीटर पर्यंत मेट्रोचा विस्तार झाला असून मुंबईच्या मेट्रोचा तिसरा टप्पा हा पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.