भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला संरपंचाच्या कानशिलात लगावून केला विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कदम-वाकवस्ती या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचाला कानशिलात मारून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुजित सुभाष काळभोर असे आहे. या प्रकरणी पांडवदंड रोड कदमवाक वस्ती येथील महिला सरपंचाने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला सरपंच संभाजीनगर येथील एंजल हायस्कूल येथे लसीकरण सुस्थितीत पार पाडण्यासाठी उपस्थित होत्या. यादरम्यान लसीकरण केंद्रावर अविनाश उर्फ पप्पू बडदे व आरोपी काळभोर यांच्यात वाद झाला. यावेळी सुजित काळभोरने बडदे यांच्या कानाखाली लगावली.

या दोघांमधील वाद पाहून महिला सरपंच यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून सुजित काळभोर यांनी महिलेच्या कानशिलात लगावत त्यांची साडी ओढली. यानंतर पोलिसांनी सुजित काळभोरवर विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लोणी-काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.