Push Pull Train : देशात लवकरच धावणार 600 पुश-पुल ट्रेन; 15000 कोटींचं टेंडर

Push Pull Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) मध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बदल घडताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वेमार्गाचे विदयुतीकरण करणे हा भारतीय रेल्वेचा मुख्य उद्देश असून याअंतर्गत आत्तापर्यंत 90% पेक्षा अधिक विदयुत्तीकरण पुर्ण झाले आहे. याचबरोबर आता भारतीय रेल्वे विदयुतीकरणावर आधारित  “पुश अँड पूल ” तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेगाड्या (Push Pull Train) चालवणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून 600 लोकोमोटिव्हसाठीचे टेंडर  काढण्यात  आले आहे. यासाठी तब्बल 15000 कोटीं खर्च करण्यात येणार आहेत. तर पुश अँड पुल तंत्रज्ञान म्हणजे आहे तरी काय? हे जाणून घेऊयात.

600 लोकोमोटिव्ह केले जाणार तयार : Push Pull Train

भारतीय रेल्वे पुढील काळात मोठ्या प्रमाणात “पुश अँड पूल” तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे चालवणार आहे. त्यासाठी आवश्यक लोकोमोटिव्ह ” बनारस  लोकोमोटिव्ह वर्क्स ” वाराणसी येथे बनवले जाणार आहेत. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये 600 पुश अँड पूल लोकोमोटिव्ह तयार  केले जाणार आहेत. रेल्वेच्या योजनेनुसार, 600 पैकी सुमारे 100 पुश-पुल लोकोमोटिव्ह प्रवासी गाड्यांना नेण्यासाठी वापरल्या जातील, तर उर्वरित 500 मालवाहतुकीसाठी वापरल्या जातील,

किती असेल खर्च?

रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे वापरले जाणारे तंत्रज्ञान हे अधिक फायदेशीर आहे. त्यासाठी येणारा खर्च देखील तितकाच मोठा आहे. यात प्रत्येक लोकोमोटिव्हसाठी 12 करोड इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय  रेल्वेने एकूण 15000 करोड  रुपयांचे टेंडर यासाठी जारी केले आहे.

कसे  काम करते “पुश  अँड पूल ” तंत्रज्ञान :

रेल्वेत वापरले जाणारे हे पुश-पुल तंत्रज्ञान रेल्वेला (Push Pull Train) एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून देणार आहे. पुश – पुल तंत्रज्ञान नेमके कसे काम करते? तर पुश-पुल ट्रेनमध्ये, ट्रेनच्या दोन्ही टोकांना दोन लोकोमोटिव्ह एकाच वेळी वापरले जातात. ते एका ड्रायव्हरद्वारे नियंत्रित केले जातात. पुश-पुल पद्धतीने ट्रेन अधिक वेगाने चालवली  जाऊ शकते. त्यामुळे रेल्वेचा स्थानकांवर थांबण्याचा वेळ कमी होऊन वळणावरचा वेग सुधारला जातो. यामध्ये रेल्वे ला रेक बसवणे सोपे होईल आणि पुढे जाण्यासाठी ट्रेनला मागे टाकण्याची किंवा उलटण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक महत्वाचे मानले जात आहे. ह्यामुळे ट्रेनचा होणारा अपघातही टळू शकतो. असे सांगण्यात येत आहे.