हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण चिघळले आहे. नवनीत राणा यांचे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलनं असो वा किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला असो, या एकूण संपूर्ण घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल का अशी शक्यता आणि चर्चानी जोर धरला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विट ने खळबळ उडाली आहे
“राष्ट्रपती राजवट लावा… लै मजा येईल” असं ट्विट आव्हाड यांनी केलंय. आव्हाड यांनी मध्यरात्री केलेल्या या ट्विटने खळबळ उडाली आहे. खरं तर भाजप नेते सातत्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत . त्या संदर्भाने जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून सातत्याने राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होत. त्यामुळे राज्यात खरच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतेय का हे पहावं लागेल