कर्जत प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यावर कडवी टीका केली आहे. मतदारसंघात रस्ते झाले म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. येथील पाण्याचा आणि महिला , तरुणवर्गाचा रोजगाराचा प्रश्न बिकट आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत. राम शिंदे यांच्या विरोधात आघाडीचे संभाव्य उमेदवार असणारे रोहित पवार सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात चांगलेच रान तापवत आहेत.
शरद पवार हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. शरद पवार व्यक्ती नव्हे तर एक विचार आहे त्यांच्या वर सध्या अनेक लोक टीका करत आहेत. त्यांना वाटते आहे की शरद पवार यांच्यावर टीका केल्यास आपण मोठे होऊ म्हणून ते सध्या शरद पवारांना लक्ष करत आहेत असा भक्तीसुर देखील रोहित पवार यांनी आळवला आहे.
आघाडीच्या जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र कोणत्या जागी कोणी लढायचे हे मात्र निश्चित झाले नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अधिक वेळ नदौडता लवकर जागा वाटप करावे. त्यामुळे प्रचार कामास वेग येईल. यात वेळ घालवल्यास त्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला होईल असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.