भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास राहुल द्रविड तयार; अधिकृत घोषणा बाकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज भारतीय खेळाडू राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने याबाबत वृत्त दिले असून राहुल द्रविडचा कोच म्हणून दोन वर्षांचा कालावधी असेल म्हणजेच 2023 पर्यंत टीम इंडियाची जबाबदारी राहुल द्रविडकडे असेल.

दुबईत बीसीसीआयचे पदाधिकारी असलेले सौरव गांगुली आणि जय शाह यांची राहुल द्रविडसोबत बैठक झाली. त्याच बैठकीत राहुल द्रविडला कोच होण्यासाठी दोघांनी गळ घातली आणि त्याला राहुलनं संमती दिली. त्यामुळे राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

दरम्यान, राहुल द्रविडने यापूर्वी अंडर19 चे प्रशिक्षकपद भूषवले होते. राहुल द्रविडच्या तालमीत तयार झालेले युवा खेळाडू आयपीएल मध्ये आपली छाप सोडत आहेत. त्यामुळे भारतीय संघाला पण द्रविडच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Leave a Comment