राहुल गांधी कोरोना पॉझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोनचं दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या.

काही लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली असता माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षेतची काळजी घ्या, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल आहे.

पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिद्धू करोना पॉझिटिव्ह आढळलेत. उल्लेखनीय म्हणजे बलबीर सिद्धू सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत संगरूरच्या रॅलीत सहभागी झाले होते. ‘शेती वाचवा’ कार्यक्रमात स्टेज सेक्रेटरी म्हणून काल बलबीर सिद्धू यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याही संपर्कात आले होते.

 

You might also like