भविष्यात हॉवर्डमध्ये मोदींच्या ‘या’ ३ अपयशांचा दाखला दिला जाईल- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवलं जाईल असं म्हणत टोला लगावला आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना करोना व्हायरसविरोधातील लढाई २१ दिवसांमध्ये जिंकू असं सांगत आहेत. मोदींचा हा दावा फोल ठरला असून व्हिडीओत कोरोनाविरोधातील लढाईला १०० पेक्षा जास्त दिवस झाले असून भारत जागतिक देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचंही दाखवण्यात आलं आहे.

कोरोनाचं संकट आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण लॉकडाउनला ३ महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या देशात जवळपास सात लाख करोनाचे रुग्ण असून १९ हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment